तापमानातील वाढीवर शरिराला थंड ठेवण्यासाठी घरगुती उपाय

तापमानातील वाढ पहाता शरिराला थंड ठेवण्यासाठी सगळ्यात सोपी, प्रभावी आणि अन्य कोणतेही दुष्परिणाम न करणारे २ मार्ग म्हणजे धने-जिरे पाणी आणि वाळ्याची जुडी घातलेले पाणी. यासाठी घ्यायची काळजी येथे देत आहे.

वैद्य परीक्षित शेवडे

१. रात्रभर धने-जिरे भिजत घालू नयेत. जेमतेम पाऊण ते एक घंटा भिजवून ते पाणी गाळून घ्यावे. (प्रमाण हे अनुभवानुसार ठेवावे.)

२. वाळ्याच्या जुडीचा दोरा सोडवून मग वापर करावा. आठवड्यातून एकदा जुडीला ऊन दाखवावे.

वरील दोन्ही उपायांनी सब्जासारख्या अन्य उपायांप्रमाणे भूक न्यून होणे, सर्दी होणे वगैरे दुष्परिणाम दिसत नाहीत हे विशेष.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (४.५.२०२४)

(साभार : वैद्य परीक्षित शेवडे यांचे ‘घरोघरी आयुर्वेद’ फेसबुक)