नकाशात भारताच्या ३ भागांचा समावेश !
काठमांडू (नेपाळ) – नेपाळने त्याच्या १०० रुपयांच्या नोटांवर देशाचा नवीन नकाशा छापण्याची घोषणा केली आहे. या नकाशात लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी या ३ भागांचा समावेश करण्यात येणार आहे. हे तिन्ही प्रदेश भारताचे अविभाज्य अंग आहेत. नेपाळ गेल्या काही वर्षांपासून हे भाग त्याचे असल्याचा दावा करत आहे.
१. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाने १०० रुपयाच्या नोटेवर नवीन नकाशा छापण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरकारमधील मंत्री रेखा शर्मा यांनी दिली.
२. नेपाळने १८ जून २०२० या दिवशी राजकीय नकाशात लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी या ३ भागांचा समावेश केला होता. त्यासाठी राज्यघटनेत संशोधन करण्यात आले होते. भारताने या नकाशावर आक्षेप घेतला होता.
संपादकीय भूमिकाचीनच्या जोरावर भारताशी शत्रूत्वाने वागण्याचा प्रयत्न करणारा नेपाळ आत्मघात करून घेत आहे. भारताने नेपाळला समजेल अशा भाषेत त्याला समजावणे आवश्यक आहे ! |