Rohith Vemula : रोहित वेमुला दलित नव्हता ! – तेलंगाणा पोलीस

दलित नसल्याचे उघड झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, या भयाने रोहितने केली होती आत्महत्या !

रोहित वेमुला

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूच्या ८ वर्षांनंतर तेलंगाणा पोलिसांनी प्रकरण बंद केल्याचा अहवाल प्रविष्ट (दाखल) केला आहे. रोहित हा दलित नव्हता, असे त्यात म्हटले आहे. पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले की, रोहितला माहिती होते की, तो दलित नाही. जातीय ओळख उघड झाली, तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल, या भयाने त्याने आत्महत्या केली.

यामुळे या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप करण्यात आले होते, त्या सर्वांना निर्दोष घोषित करण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे सिकंदराबादचे तत्कालीन खासदार आणि सध्याचे हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, विधान परिषदेचे सदस्य आमदार एन्. रामचंद्र राव, माजी कुलगुरू अप्पा राव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांसह अनेक प्रमुख राजकीय व्यक्तींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पोलिसांनी २१ मार्च या दिवशीच अहवाल सादर केला होता. त्यात म्हटले होते की, अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राद्वारे रोहितने शैक्षणिक यश संपादन केले होते.

यावर रोहितची आई आणि त्याचा भाऊ राजा यांनी मात्र पोलिसांच्या अहवालावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, अनुसूचित जाती दर्जाविषयी जिल्हाधिकारी निर्णय घेतील. दोघांनी या अहवालावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर तेलंगाणाचे पोलीस महासंचालक म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची पुन्हा चौकशी करू.

संपादकीय भूमिका

रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि दलितांची कैवारी म्हणवणार्‍या काँग्रेसने आकांततांडव केला होता. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यासह जनतेने काँग्रेसला जाब विचारला पाहिजे !