नाशिक येथील वैद्यकीय अधिकारी आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चे वर्गणीदार डॉ. कुलदीप दिलीप शिरपूरकर यांना सुचलेली कविता येथे देत आहोत.
माय भवानी तुळजामाता ।
तुझिया चरणी ठेवितो माथा ।
चरणी तुझ्या लीन मी होता ।
षड्रिपू सर्वची गळुनिया जाता ।। १ ।।
दिव्य तुझ्या मंदिरी आलो मी ।
पुढती लोटांगण घालितो मी ।
न माझा राहिलो मी ।
तुझ्याशी एकरूप झालो मी ।। २ ।।
तुळजापूर तुझे हे ठाण ।
मज उद्धरी तुजवीण कोण ।
आहे मी बालक लहान ।
तुझी कृपा आहे ग महान ।। ३ ।।
तुझे मंदिर वर्णू मी कसे ।
मजशी हे स्वर्गलोक भासे ।
रूप तुझे नेत्री दिसे ।
मनी चिंता कसलीच नसे ।। ४ ।।
आम्हावरती कृपा ठेवूनी ।
सेवेची मज संधी देऊनी ।
सुंदर साडी तुज लेऊनी ।
तुझ्या चरणी भान हरपूनी ।। ५ ।।
नमितो तुजला वंदितो आता ।
माते तुझे गुण वर्णितो आता ।
तुझ्या भक्तीत धुंद मी होता ।
भासे तू समक्ष असे आता ।। ६ ।।
– डॉ. कुलदीप दिलीप शिरपूरकर, नाशिक (३१.३.२०२४)