‘हलाल अर्थव्यवस्थे’साठी ‘हलाल’ संकल्पनेचा विस्तार !

इस्लामी धर्मग्रंथांमध्ये मांस वगळता अन्य क्षेत्रांसाठी ‘हलाल’ संकल्पना स्पष्टपणे मांडलेली नाही. त्यामुळे ती स्थानिक स्थितीनुसार ठरवली जात आहे आणि त्याद्वारे ‘हलाल’ संकल्पनेचा विस्तार केला जात आहे.

१. ‘हलाल अर्थव्यवस्था’ व्यापक करण्यासाठी ‘हराम’ गोष्टींना ‘हलाल’ ठरवणे

‘हलाल’ संकल्पनेला अर्थव्यवस्थेची जोड दिल्यामुळे काही वर्षांपूर्वी ‘हराम’ मानल्या जाणार्‍या गोष्टी आज ‘हलाल’ ठरवल्या जात आहेत. ‘हराम’ वस्तूंना ‘हलाल’ ठरवण्याचे उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वी ‘अजान’ची हाक हा ईश्वराचा पवित्र ध्वनी मानला जात असे, त्यासाठी मानवनिर्मित ध्वनीक्षेपक यंत्राचा वापर करणे, हे ‘हराम’ मानले जात होते. वाढती जनसंख्या आणि अन्य धर्मियांकडून होणारा वापर लक्षात घेऊन त्याच ध्वनीक्षेपक यंत्राला नंतरच्या काळात ‘हलाल’ ठरवण्यात आले. आज मशिदींवरील त्याच ध्वनीक्षेपकांच्या मोठ्या आवाजामुळे सामाजिक शांतता भंग होत आहे. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी सौंदर्य प्र्रसाधनांचा वापर करून ‘मेक्अप’ करण्याला ‘हराम’ मानले जात होते. आता मात्र सौंदर्य प्रसाधनांनाच ‘हलाल प्रमाणपत्र’ दिले जात आहे. ‘हलाल अर्थव्यवस्था’ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे नियमांमध्ये अनुकूल पालट करून ‘हलाल’ संकल्पना व्यापक करण्यात येत आहे.

२. शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थही ‘हलाल’ प्रमाणित करणे

आता मांसाहारी पदार्थच नव्हेत, तर सुप्रसिद्ध ‘हल्दीराम’चे शुद्ध शाकाहारी नमकीनसुद्धा ‘हलाल’ प्रमाणित झाले आहे. धान्य, खाद्यतेल, गव्हाचे पीठ, सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, शीतपेये इत्यादींनाही ‘हलाल’ प्रमाणित करण्यात आले आहे.

३. पाश्चात्त्य बहुराष्ट्रीय आस्थापनांचे खाद्यपदार्थ

आता ‘मॅकडोनॉल्ड’चा बर्गर, ‘डॉमिनोज’चा पिझ्झा, तसेच बहुतेक सर्वच विमानांत मिळणारे भोजन, हे सर्व ‘हलाल’ प्रमाणित करण्यात आले आहे.

४. औषधे

युनानी, आयुर्वेदीय औषधे, तसेच मध यांतही ‘हलाल’ची संकल्पना लागू करण्यात आली आहे. औषधांतील ‘हलाल’च्या विस्ताराचे एक उदाहरण म्हणजे तुळशीचा अर्क, तसेच तुळशी-आले चहा ही उत्पादनेही ‘हलाल’ प्रमाणित झाली आहेत.

५. सौंदर्यप्रसाधने

साबण, काजळ, ‘शाम्पू’, ‘टूथपेस्ट’, ‘नेलपॉलिश’, ‘लिपस्टिक’ इत्यादी सौंदर्यप्रसाधनेही आता ‘हलाल’ प्रमाणित करण्यात आली आहेत.

६. ‘हलाल फॅशन’

या अंतर्गत मुसलमान स्त्रियांसाठी ‘हिजाब’, ‘बुरखा’, तसेच अन्य इस्लामी वस्त्रप्रावरणे आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहेत. आज जगभरात ‘हाउटे हिजाब’, ‘एटलियर हिजाब’, ‘वेला स्कार्व्हज’ इत्यादी अनेक ‘हलाल फॅशन’ आस्थापने प्रसिद्ध आहेत.

७. ‘हलाल’ प्रमाणित घरगुती यांत्रिक उपकरणे

इंडोनेशियामध्ये ‘रेफ्रिजरेटर’, तसेच ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’, या घरगुती यांत्रिक उपकरणांनाही प्रथमच ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यात आले. जपानमधील ‘शार्प कॉर्पाेरेशन’ या घरगुती यांत्रिक उत्पादने बनवणार्‍या आस्थापनाने उत्पादित केलेली ‘रेफ्रिजरेटर्स’, तसेच ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ यांना ‘हलाल’ प्रमाणित करण्यात आले. त्यांच्या निर्मितीमध्ये ‘हराम’ मानलेल्या कोणत्याही पदार्थांचा समावेश नाही’, असे घोषित करण्यात आले. वास्तविक पहाता या यांत्रिक उत्पादनांचा आणि ‘हलाल’च्या धार्मिक संज्ञेचा कोणताही संबंध नाही; मात्र ‘हलाल मार्केटिंग’चा ‘हलाल फॅशन’द्वारे निर्मित आधुनिक ‘बुरखा’ आणि ‘हिजाब’ लाभ उठवून स्वतःच्या उत्पादनांच्या विक्रीत वृद्धी करण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत, हे यातून स्पष्ट होते. त्यामुळे भविष्यात स्वयंपाकघरातील ‘मिक्सर’, ‘वॉशिंग मशीन’, ‘एअर कंडिशनर’ आदींनाही ‘हलाल प्रमाणपत्र’ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

८. ‘हलाल मॉल्स’

यात ‘हलाल’ प्रमाणित साहित्याची दुकाने, ‘हलाल’ प्रमाणित खाद्यपदार्थ, तसेच मुसलमानांना प्रार्थना करण्यासाठी वेगळी सुविधा यांचा समावेश आहे.

९. ‘हलाल’ प्रमाणित गृहसंकुल

केरळ राज्यातील कोची शहरात भारतातील पहिले शरीयतच्या नियमांच्या आधारे ‘हलाल’ प्रमाणित गृहसंकुल बनत आहे. यात स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे तरण तलाव (स्विमिंग पूल), वेगवेगळी प्रार्थनाघरे, काबाच्या दिशेपासून दूर असणारी शौचालये, नमाजाच्या वेळा दाखवणारी घड्याळे, प्रत्येक घरात नमाज ऐकू येण्याची व्यवस्था, अशा विविध सुविधांचा आणि शरीयतच्या नियमांचा उल्लेख आहे.

१०. ‘हलाल’ प्रमाणित रुग्णालय

तमिळनाडू येथील ‘ग्लोबल हेल्थ सिटी’ या रुग्णालय

चेन्नई, तमिळनाडू येथील ‘ग्लोबल हेल्थ सिटी’ या रुग्णालयाला ‘हलाल प्रमाणित’ असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही इस्लाममध्ये सांगितल्याप्रमाणे स्वच्छता ठेवतो आणि ‘हलाल’ आहार देतो. याचे मुख्य कारण आखाती देशांतील धनाढ्य मुस्लिम रुग्णांना आकर्षित करणे हे आहे.

११. ‘हलाल’ वाहतूक (लॉजिस्टिक्स)

यात कोणत्याही अन्नपदार्थांची, तसेच त्यांच्याशी संबंधित घटकांची आणि कच्च्या मालाची वाहतूक करतांना ‘त्यांना कोणत्याही ‘हराम’ पदार्थांचा संसर्ग होणार नाही, तसेच अन्नपदार्थ दूषित होणार नाहीत’, याची काळजी घेतली जाते.

११. ‘हलाल पर्यटन (टूरिजम)’

‘हलाल पर्यटना’च्या अंतर्गत मुसलमानांना इस्लामी देशांत ‘हलाल’ भोजन, ‘हलाल’ विमानप्रवास, ‘हलाल’ निवास, ‘हलाल हॉटेल’, प्रार्थनास्थळ इत्यादी उपलब्ध करून दिले जात आहे. या पर्यटनात ‘हराम’ मानलेले अल्कोहोल आणि मद्य यांचा समावेश नसतो. मुसलमानांचा पाश्चिमात्य देशांत पर्यटनासाठी खर्च होणारा पैसा इस्लामी देशांना मिळावा किंवा इस्लामी नसलेल्या देशांनी मुसलमान पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष ‘इस्लामी’ सुविधा द्याव्यात, हाही यामागचा एक उद्देश आहे.

१२. ‘हलाल डेटिंग’ संकेतस्थळे

सध्या युवक-युवतींचा परिचय करून देणारी आणि त्यातून भेट घडवणारी अनेक ‘ऑनलाइन डेटिंग’ संकेतस्थळे प्रचलित आहेत. या क्षेत्रातही शरीयतवर आधारित ‘हलाल डेटिंग वेबसाईट्स’ चालू करण्यात आल्या आहेत. यात ‘मिंगल’ हे एक मुख्य संकेतस्थळ आहे.

(संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ : हलाल जिहाद ?)