हलाल जिहादमुक्त भारत विशेषांकाच्या निमित्ताने…!

‘धार्मिकतेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या संदर्भातील संशोधन आणि अभ्यास लोकांसमोर मांडला जावा, जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था सुदृढ व्हावी, हा या विशेषांकाचा उद्देश आहे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणे किंवा कुणामध्ये तेढ निर्माण करणे, हा यामागील उद्देश नाही.

शरीयत आधारित ‘इस्लामिक बँके’ला अनेक देशांत विरोध झाला; मात्र ग्राहक अधिकार, तसेच कट्टर धर्मपालनाचा आग्रह यांमुळे ‘हलाल अर्थव्यवस्था’ आज पुष्ट होतांना दिसत आहे. मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ आणि वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. त्यासाठी ‘हलाल सर्टिफिकेट’ अनिवार्य बनले. आश्चर्य म्हणजे ‘सेक्युलर’ भारतातील शासकीय आस्थापनांतही ‘हलाल’ अनिवार्य करण्यात आले. देशात केवळ १५ टक्के असणार्‍या अल्पसंख्य मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत ‘हलाल’ मांस भक्षण करायचे आहे; म्हणून उर्वरित जनतेवरही ते लादण्यात येऊ लागले. आतातर हे ‘हलाल सर्टिफिकेट’ केवळ मांसापुरते मर्यादित न रहाता खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालय, गृहसंस्था, मॉल, पर्यटन इत्यादी क्षेत्रांतही चालू झाले. इस्लामी देशांत निर्यात करणार्‍यांसाठी तर ‘हलाल सर्टिफिकेट’ बंधनकारकच बनले आहे. आज ‘मॅकडोनॉल्ड’सारखी विदेशी आस्थापने हिंदूबहुल भारतात १०० टक्के ‘हलाल’ पदार्थ विक्री करून हिंदु ग्राहकांच्या धार्मिक अधिकारांचा अपमान करत आहेत ! यातून निर्माण केल्या गेलेल्या ‘हलाल अर्थव्यवस्थे’ने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने अल्पावधीतच २ ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्सचा टप्पाही गाठला आहे.

जेव्हा पंथावर आधारित अर्थव्यवस्था उभी रहाते, तेव्हा देशाच्या विविध यंत्रणांवर तिचा परिणाम निश्चितच होतो. येथे तर ‘शरीयत’वर आधारित एक अर्थव्यवस्था उभी रहात आहे. त्यामुळे तिचा ‘सेक्युलर’ भारतावरही निश्चित परिणाम होणार आहे. या दृष्टीने ‘भविष्यात स्थानिक व्यापारी, परंपरागत व्यवसाय करणारे, उद्योजक, तसेच अंतिमतः राष्ट्र यांना कोणता धोका संभवतो ?’, याचा विचार करणे आवश्यक आहे. अशा वेळी भारताने वेळीच सावध व्हायला हवे ! भारत शासनाने ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्‍या इस्लामी संस्था ‘सर्टिफिकेट’च्या माध्यमातून गोळा केलेल्या धनाचा कसा वापर करतात ?’, याची सखोल चौकशी केली पाहिजे. ‘सेक्युलर’ भारतात ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ FSSAI सारखी शासकीय व्यवस्था असतांनाही ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्‍या इस्लामी संस्थांची आवश्यकताच काय आहे ? या विशेषांकाच्या निमित्ताने या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न !

(संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ : हलाल जिहाद ?)