Houthi Terrorists Attack : हुथी आतंकवाद्यांकडून भारतात येणार्‍या नौकेवर लाल समुद्रात आक्रमण

नवी देहली – येमेनच्या हुथी आतंकवाद्यांनी भारतात येणार्‍या नौकेवर लाल समुद्रात आक्रमण केले. या नौकेचे नाव ‘एंड्रोमेडा स्टार’ असून ती तेल घेऊन भारतात येत होती. या आक्रमणात नौकेची किरकोळ हानी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ही नौका ब्रिटनची असून आक्रमणानंतरही तिने प्रवास चालू ठेवला. ती गुजरातमधील वाडीनार येथे  पोचणार आहे.

सौजन्य Hindustan Times

आक्रमणांमुळे भारताची होत आहे हानी !

भारताचा ८० टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. त्याच वेळी ९० टक्के इंधनदेखील सागरी मार्गाने येते. सागरी मार्गावरील आक्रमणांचा थेट परिणाम भारताच्या व्यवसायावर होतो. भारतातून युरोपला डिझेलचा पुरवठा गेल्या २ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोचला आहे. यात अनुमाने ९० टक्के घट झाली आहे. आशियातून युरोपीयन युनियन आणि ब्रिटनमध्ये जाणार्‍या मालवाहतुकीचे शुल्क वाढले आहे.