Hafiz Saeed’s Relative Shot Dead : पाकमध्ये आतंकवादी हाफीज सईद याचा नातेवाईक असणार्‍या आतकंवाद्याची अज्ञाताकडून हत्या

सीसीटीव्हीमध्ये ही घटना चित्रित झाली

कराची (पाकिस्तान) – लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार असणारा आतंकवादी हाफीज सईद  याचा नातेवाईक असणार्‍या एका आतंकवाद्यांची कराचीमध्ये एका अज्ञाताने गोळ्या झाडून हत्या केली. अब्दुल रहमान असे त्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबासाठी पैसे गोळा करण्याचे काम करत होता.

 

येथील सीसीटीव्हीमध्ये ही घटना चित्रित झाली आहे. येथे दुकानात उपस्थित असलेल्या अब्दुल रहमानकडून एक व्यक्ती वस्तू खरेदी करण्यासाठी आल्याचे दिसून येते. त्यानंतर अब्दुलवर या व्यक्तीने गोळीबार केला आणि पळून गेला, असे दिसते.  गोळी लागल्याने अब्दुल रहमान याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी अज्ञाताकडून आतंकवादी फैसल नदीम उपाख्य अबू कटाल सिंधी याची हत्या केली होती. अबू कटाल हा हाफीज सईदचा पुतण्या होता.