मुंबई – पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ‘शून्य भंगार’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातील, तसेच कारखान्यातील भंगार गोळा करण्यात आले असून पश्चिम रेल्वेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ४६९ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. पश्चिम रेल्वेने ‘शून्य भंगार’ मोहिमेला प्राधान्य देऊन कालबाह्य इंजिन, डिझेल इंजिन, रेल्वे रूळ, जुने किंवा अपघाती इंजिन/डबे यांसह विविध प्रकारच्या भंगाराची विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलली आहेत.