|
छत्रपती संभाजीनगर – येथील ताहेर पठाण, तय्यब पठाण, आयेशा पठाण आणि लैलाबी पठाण यांनी २७ वर्षीय हिंदु तरुणीवर अत्याचार करून तिला जाणीवपूर्वक फसवून इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडले, तसेच हिंदु तरुणीला गोमांस खायला देऊन तिला कुराणही शिकवले. या प्रकरणी वरील धर्मांधांच्या विरोधात विविध कलमांन्वये सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१. मुख्य धर्मांध आरोपी ताहेर पठाण याने हिंदु असल्याची बतावणी करून हिंदु तरुणीशी ओळख वाढवली आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. आरोपींनी हिंदु तरुणीला बुरखा घालून गोमांस खाण्यास भाग पाडले. धर्मांध ताहेर याने तरुणीला इस्लाम पंथ स्वीकारण्यास भाग पाडले.
२. हिंदु तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वर्ष २०२० मध्ये हिंदु तरुणीची ताहेर याच्या समवेत एका ‘शोरूम’मध्ये भेट झाली होती. ताहेर याने हिंदु तरुणीला त्याचे नाव समीर पटेल असे सांगून त्याचा विवाह झालेला नाही, असे खोटे सांगितले. यानंतर त्यांची ओळख वाढली आणि त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण झाले.
३. त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवून हिंदु तरुणीचा अश्लील व्हिडिओही बनवला आणि धमकावले. या संपूर्ण प्रकरणाच्या २ वर्षांनंतर समीर पटेल हा ‘ताहेर पठाण’ असल्याचे पीडित हिंदु तरुणीला समजले.
४. जेव्हा हिंदु पीडितेने ताहेर याला त्यांचे नाते संपवण्यास सांगितले, तेव्हा तिची वैयक्तिक अश्लील छायाचित्रे संकेतस्थळावर प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. ताहेर याने हिंदु तरुणीला धमकावून तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगून विवाह करण्यासाठी दबाव टाकला.
५. याच काळात हिंदु तरुणी गरोदर राहिली. त्यानंतरही ताहेर याने हिंदु तरुणीवर अत्याचार करून तिच्या पोटातील बाळाची हत्या केली. त्यानंतर तिचे धर्मांतर करून गोमांस खाण्यास भाग पाडले आणि बुरखा घालायला लावला.
६. हिंदु तरुणीला एका मौलानाकडे नेऊन तेथे तिला १ महिना काहीतरी प्यायला देण्यात आले. त्यामुळे हिंदु तरुणी नशेत होती. यानंतर हिंदु तरुणीला नमाज पढायला आणि कुराण वाचायला लावले.
७. प्रत्यक्षात ताहेर पठाण आधीच विवाहित होता आणि त्याला ४ मुले आहेत. त्याने हिंदु पीडितेला जाळ्यात अडकवले. यात त्याचे वडील तय्यब पठाण, आई लैलाबी पठाण आणि पहिली पत्नी आयेशा पठाण यांनीही त्याला साथ देऊन हिंदु तरुणीला मारहाण केली.
८. पीडितेला आधी पोलीस ठाण्यात तक्रार करायची होती; पण कुणीही तिला साथ दिली नाही. हिंदु समाजातील काही लोक आणि सुदर्शन वृत्तवाहिनीचे पत्रकार यांनी तिच्या साहाय्यासाठी पुढे आले. ‘लव्ह जिहाद’प्रकरणी तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (मुसलमान गुन्हेगारांना साहाय्य करण्यासाठी सर्व मुसलमान संघटित होतात; मात्र हिंदु तरुणीला साहाय्य करण्यासाठी प्रथम कुणीही पुढे येत नाही, हे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअजून किती हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर लव्ह जिहाद्यांना कायमचा वचक बसणार ? स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! |