२२ कोटी ८२ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ जप्त
‘मॉडेल’ म्हणजे एखाद्या विशिष्ट आस्थापनाने बनवलेले कपडे, अन्य साहित्य यांचा प्रसार करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती

नवी मुंबई – बँकॉकहून मुंबईत अत्यंत महागड्या आणि उच्च दर्जाच्या हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणार्या हर्षा सनी (वय २८ वर्षे) या मॉडेलला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. ती वर्ष २०२५ च्या प्रसिद्ध ‘मिसेस केरळ’ सौंदर्यस्पर्धेतील अंतिम स्पर्धकांपैकी एक होती. सीमाशुल्क विभागाने २२ कोटी ८२ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
तिच्या बॅगेत १२ मोठ्या पाकिटांमध्ये गडद हिरव्या रंगाचा वनस्पतीजन्य पदार्थ आढळला. शोध घेतल्यावर तो गांजा असल्याचे आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हायड्रोपोनिक अमली पदार्थाचे मूल्य ११ कोटी ८२ लाख रुपयांहून अधिक आहे. या प्रकरणी तिची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !