अमेरिकेच्या आक्रमणात नौकेवरील ३ भारतीय मारले गेले असतांना ट्रम्प यांचे निलाजरे विधान
भारताचा निषेध कायम

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले, असे निलाजरे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेने ओमानजवळील समुद्रात असलेल्या‘एम.टी. सेटेबेल्लो’ या नौकेवर केलेल्या आक्रमणात ३ भारतीय नागरिकांचा नुकताच मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेचा कठोर शब्दांत निषेध केला. यावर डॉनल्ड ट्रम्प यांनी वरील विधान केले.
ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘हॉर्मुझमधून जाणार्या भारतीय कर्मचारी असलेल्या नौकांवर इराणने ड्रोनद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता; अमेरिकेच्या सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडला.’ अलीकडे ओमानच्या आखातात ‘एम्.टी. मारिव्हेक्स’, ‘एम्.टी. सेटेबेलो’ आणि ‘एम्.टी. जलवीर’ या व्यापारी नौकांवर झालेल्या आक्रमणांचा भारतीय कर्मचार्यांना चांगलाच फटका बसला.
इराणने दावा फेटाळला !
इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावत इराणने भारतीय नागरिक असलेल्या कुठल्याही नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण केले नाही, असा खुलासा केला.
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक
Mother Alleges ChatGPT : ‘चॅटजीपीटी’मुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !
कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !
Elon Musk : इलॉन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ !
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
Pakistani Brutality Rawalakot PoK : रावलकोट (पाकव्याप्त काश्मीर) : पाक सैन्याने पुन्हा केले १६ नागरिकांना ठार !