आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी कारवाई
ममता बॅनर्जी साहाय्यासाठी तातडीने उपस्थित

कोलकाता (बंगाल) – बंगाल पोलिसांच्या एका मोठ्या पथकाने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट (पटुआपाडा) येथील निवासस्थानी धाड घातली. १२ जानेवारीच्या मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. धाड घालण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकार्यांनी आरंभी बराच वेळ अभिषेक बॅनर्जी यांच्या घराचा दरवाजा ठोठावला; परंतु दार न उघडल्याने पोलिसांनी कडी तोडून घरात प्रवेश केला आणि अनुमाने ५ घंटे घराची कसून झडती घेतली. या कारवाईच्या वेळी केंद्रीय सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर बंद (सील) केला होता.
🚨 Bengal: Late-night police raid at the residence of Abhishek Banerjee in connection with an alleged financial scam.
🔹 Mamata Banerjee reportedly rushed to the spot soon after the action began.
⚖️ Allegations of corruption linked to the TMC regime are gradually surfacing.… pic.twitter.com/DUo23KO83A
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2026
या घटनेची माहिती मिळताच ममता बॅनर्जी पहाटे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोचल्या. यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. या वेळी अभिषेक म्हणाले की, पोलिसांनी कडी तोडून संपूर्ण घराची झडती घेतली. आमच्याकडे सर्व चित्रीकरण आहे. तथापि आम्ही अन्वेषण यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करू.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अभिषेक यांची बनावट स्वाक्षरी प्रकरणात नुकतीच ५.३० घंटे चौकशी केली. त्यांना १४ जूनला पुन्हा याच प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या तक्रारीवरून कारवाई !
शालबनी येथील तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या तक्रारीत अभिषेक बॅनर्जी यांचे स्वीय्य साहाय्यक सुमित राय यांच्यावर निवडणूक तिकीट मिळवण्याच्या नावाखाली आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !