मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महापालिकांना सुनावले !

मुंबई – मुंबई आणि ठाणे येथील झाडांभोवतीचे सिमेंट-काँक्रिटीकरण न हटवल्याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही महापालिकांच्या कारभारावर खेद व्यक्त केला. ‘झाडे किती आवश्यक आहेत, हे सांगण्याची आवश्यकता नाही; परंतु झाडांच्या संवर्धनाविषयी आपल्याकडे कायदा आणि न्यायालयाचे आदेश असूनही कार्यवाहीचे आदेश केवळ कागदावरच आहेत. झाडांच्या संवर्धनाच्या संदर्भात असाच निष्काळजीपणा चालू राहिल्यास भावी पिढीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालये बांधण्याची वेळ आपल्यावर येईल’, अशा शब्दांत न्यायालयाने दोन्ही महापालिकांना सुनावले. सिमेंट आणि काँक्रिटीकरणामुळे वृक्ष कोसळतात, तसेच पर्यावरणीय हानीही होते. यासंदर्भात चिंता व्यक्त करणार्या जनहित याचिकेची न्यायालयाने सुनावणीच्या वेळी गंभीर नोंद घेतली. या वेळी अधिकार्यांसह यासंदर्भातील पहाणी करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !