१ पुरुष आणि २ महिला यांच्या विरोधात गुन्हा नोंद

पुणे – ‘हिंजवडी पार्क’मधील ‘टी.सी.एस्.’मधील (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) ४८ वर्षीय अभियंता अमित अभय ब्रह्मे यांनी २ जून या दिवशी कार्यालयातील सहकारी आणि वरिष्ठ यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी विनोद जेठाल पालीचा, अर्चना आणि शाश्वती यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अमित यांचा मुलगा अनिश याने या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. यामुळे ‘माहिती तंत्रज्ञान’ (आय.टी.) क्षेत्रातील कामाच्या ठिकाणीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
१. अमित हे ‘डी.ई.जी.’ प्रकल्पात कार्यरत होते. त्यांना गेल्या काही काळापासून वरिष्ठ आणि सहकारी यांच्याकडून नाहक त्रास दिला जात होता.
२. त्यांच्या कामात त्रुटी काढणे, खोट्या तक्रारी करणे, सर्वांसमोर अपमानास्पद बोलणे अशा प्रकारे ते मानसिक त्रास देत होते.
३. अमित यांची पत्नी असाध्य आजाराने त्रस्त असल्याने कौटुंबिक दायित्वामुळे ब्रह्मे आधीच तणावाखाली होते.
४. अमित यांचे मित्र विनोद यांच्या घरातील कौटुंबिक वादातून त्यांची पत्नी परदेशात गेली. त्यामागे ब्रह्मे दांपत्याचा हात असल्याचा विनोद यांना संशय होता.
५. विनोद यांनी अमित यांच्या विरोधात चोरी आणि फसवणुकीच्या तक्रारी केल्या होत्या. अधिवक्त्यांकडून नोटीस पाठवून त्यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीमध्ये नमूद केला आहे.
६. आस्थापनातील २ महिला आणि विनोद यांच्याकडून होत असलेला छळ अन् सातत्याने केल्या जाणार्या तक्रारींमुळे स्वत: आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे अमित यांनी ‘सुसाईड नोट’ (‘चिठ्ठी’मध्ये) नोंद केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !