कॅनेडातील महिलेकडून ‘ओपनएआय’ आस्थापनेविरुद्ध खटला प्रविष्ट (दाखल)
(चॅटजीपीटी म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून बनवलेली संगणक प्रणाली)

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘चॅटजीपीटी’मुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करत कॅनेडातील एका महिलेने ‘ओपनएआय’ आस्थापन आणि त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांच्याविरुद्ध अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) केला. या खटल्यानुसार २४ वर्षीय ॲलिस कॅरियर ही आत्महत्येच्या विचारांशी झगडत असतांना चॅटबॉटने तिला ‘कदाचित् हाच शेवट असेल’, असे सांगितले. यापूर्वीही विविध लोकांकडून अशा प्रकारचे अनेक खटले प्रविष्ट करण्यात आले आहेत.
ॲलिस हिची आई क्रिस्टी कॅरियर म्हणाल्या की, ॲलिसने तिच्या मृत्यूपूर्वी अनेकदा ‘चॅटजीपीटी’ला तिच्या आत्महत्येच्या विचारांविषयी सांगितले होते; परंतु ‘ओपनएआय’च्या सुरक्षा प्रणालीने मानवी पुनरावलोकनासाठी ती संभाषणे कधीही चिन्हांकित केली नाहीत किंवा ती थांबवली नाहीत. अशी परिस्थिती हाताळण्यास सक्षम नसतांनाही ‘चॅटजीपीटी’ने तिच्याशी या विषयावर मार्गदर्शकाच्या भूमिकेतून संवाद साधला. यामुळेच ती आत्महत्येसाठी प्रवृत्त झाली.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता