सनातन प्रभात’च्या कार्यामुळे भारतात संस्कृती आणि धर्म चिरतरुण राहील !
जनता सन्मार्गाने पुढे जाण्यासाठी तुम्ही (‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह) जे काही प्रयत्न करत आहात, त्याचा परिणाम कदाचित् आज नाही; परंतु काही कालावधीनंतर निश्चितच दिसून येईल. भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य हे आपणा सर्वांचे आहे, हे आज अनेक जण विसरत आहेत. अशा काळामध्ये ‘सनातन प्रभात’ एक ध्येय समोर ठेवून ज्या पोटतिडकीने कार्य करत आहे, ते पहाता भारतामध्ये आपली संस्कृती, धर्म चिरतरुण राहील. आपल्या कार्याला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! धन्यवाद ! आणि सर्वांना नमस्कार !
– श्री. सागर जावडेकर, निवासी संपादक, दैनिक ‘तरुण भारत’ (गोव आवृत्ती).
सनातन हे भवितव्य आहे ! – अनिल खंवटे, उद्योजक, आल्कॉन ग्रूप, पणजी
‘सनातन प्रभात’ आणि सनातन संस्था यांच्या स्थापनेपासूनच मी त्यांच्या पाठीशी आहे. सनातन हेच भवितव्य आहे. सनातनच्या साधकांनी त्यांचे जीवन सनातनच्या कार्यासाठी वाहून घेतले आहे. माझ्या सर्वांना मनापासून शुभेच्छा !
‘सनातन प्रभात’मधून हिंदु धर्माच्या रक्षणाचे कार्य ! – प्रवास नायक, उद्योजक, मडगाव
दैनिक ‘सनातन प्रभात’ला २५ वर्षे पूर्ण झाली. याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रारंभीपासून वाचतो. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून तुम्ही हिंदु धर्माचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहात, याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे आणि यासाठी माझा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील.