भगवंताचे दर्शन

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘भगवंताचे दर्शन म्हणजे विराट पुरुषाचे दर्शन ! भगवंताचे मुख म्हणजे ब्राह्मण, बाहू क्षत्रिय, मांड्या वैश्य आणि चरण म्हणजे शूद्र. ब्राह्मण दिसला की, परमात्म्याच्या मुखाचे दर्शन करत प्रसन्न होत. क्षत्रियाचे दर्शन हेच परमात्म्याच्या बाहूंचे दर्शन ! परमात्म्याला सहस्रशः मुखे आहेत. सहस्रशः ब्राह्मण म्हणजे परमात्म्याची सहस्रशः मुखे, सहस्रशः  क्षत्रिय म्हणजे सहस्रशः बाहू, सहस्रशः शूद्र हे भगवंताचे चरण. शूद्राचा अपमान म्हणजे भगवंताच्या चरणांचा तिरस्कार आणि क्षत्रियाचा तिरस्कार हीच परमात्म्याच्या बाहूंची घृणा ! अशी धारणा ! हीच साधना ! अशी विराटाची उपासना नियमित करायची. गीतेच्या ११ व्या अध्यायातील भगवंताचे विराट दर्शन रोमारोमांत सामावले पाहिजे. श्वासाश्वासातून ते विराट दर्शन उमटले पाहिजे. भगवत्ता रक्तात भिनली पाहिजे. देहमनाच्या कणाकणांतून क्षणाक्षणाला भगवत्ता प्रकट झाली पाहिजे.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०२३)