चंद्रपूर येथील पत्रकार लिमेशकुमार जंगम यांना ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक !

नागपूर – सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेली अपर्कीतीकारक, अश्लील पोस्ट काढून टाकण्यासाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या ‘माय चंद्रपूर’ या ‘वेबपोर्टल’चे पत्रकार लिमेशकुमार जंगम याला रामनगर पोलिसांनी ११ एप्रिल या दिवशी अटक केली. जंगम याच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणी आणि अश्लील माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

पत्रकार लिमेशकुमर जंगम याने मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांच्या कुटुंबांविषयी अपर्कीतीकारक आणि अश्लील पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून चारित्र्यहनन केले. या प्रकरणी जंगम याच्यावर सर्व स्तरांतून टीका झाली. महिलांनी सामाजिक माध्यमांतून खेद व्यक्त केला. दुर्गापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीनिवास जंगमवार यांनी लिमेशकुमार जंगम याला दूरभाष करून सामाजिक माध्यमांवरील पोस्ट काढून टाकण्याची विनंती केली; मात्र त्याने पोस्ट न काढता ५ लाख रुपयांची खंडणी मागितली.

संपादकीय भूमिका

असे पत्रकार समाजात काय आदर्श निर्माण करणार ?