मीरारोड येथे गोहत्या केल्याप्रकरणी ३ धर्मांधांना अटक !

१४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे, १२ एप्रिल (वार्ता.) – मीरारोड येथील काशीगाव भागात गोहत्या केल्याच्या प्रकरणी ३ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ठाणे न्यायालयाने १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

येथील मीनाक्षीनगर भागातील डोंगराजवळ रहाणारा नईम सैफ कुरेशी (वय ३३ वर्षे) याने मध्यरात्री एका टेम्पोतून गाय आणल्याचे स्थानिक रहिवाशांना समजले. त्याच्यावर पाळत ठेऊन तो गाय कापत असतांना रहिवाशांनी ११२ क्रमांकावर संपर्क करून त्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी नईम सैफ कुरेशी (वय ३३ वर्षे), मौसीन महेबूब पाशा (वय २४ वर्ष) आणि छंगुर हिरालाल नूर (वय ३२ वर्षे) या तिघांना अटक केली. या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध अजूनही गोहत्या करत आहेत. हे पोलिसांना लज्जास्पद !