नागपूर येथे ‘डेटिंग ॲप’द्वारे मोठ्या प्रमाणात देहव्यापार चालू !

  • १-२ दिवसांत १ ते ३ लाख रुपयांपर्यंत कमाई

  • विविध राज्यांतून तरुणी नागपूरमध्ये येतात !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ‘डेटिंग ॲप’द्वारे श्रीमंत घरातील मुलांसमवेत मोठमोठ्या हॉटेलमध्ये देहव्यापार चालू आहे. नागपूर येथे देहली, मुंबई, पंजाब, गोवा, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार येथून तरुणी देहव्यापार करण्यासाठी येत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये भोजपुरी चित्रपटात काम करणार्‍या किंवा दूरचित्रवाणीवर काम करणार्‍या तरुणींचा सर्वाधिक समावेश आहे. या तरुणी तोकड्या कपड्यांमध्ये येतात.

शहरातील धरमपेठ, सीताबर्डी, माऊंट रोड, सदर, जनता चौक आणि विमानतळ परिसर या भागांमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे. हॉटेलच्या मालकांकडून यात आर्थिक साहाय्य केले जाते. या अंतर्गत लाखो रुपयांची देवाणघेवाण केली जात असल्याचेही उघड झाले आहे. १ – २ दिवसांत जवळपास १ ते ३ लाख रुपयांपर्यंत कमाई केली जाते. या वेळी महागडे जेवण आणि महागड्या दारूची मागणी तरुणींकडून केली जाते.

भारतात देहव्यापाराचे षड्यंत्र !

‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून रशिया, उझबेकिस्तान, बांगलादेश, थायलंड, स्वित्झर्लंड, श्रीलंका येथील तरुणींना देहव्यापारात जोडणारी साखळी कार्यरत आहे. अशाच प्रकारचे जाळे भारतात निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहे.

संपादकीय भूमिका

देहव्यापाराच्या माध्यमातून तरुण पिढीला उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे ! सर्वांनीच याला कठोर विरोध करायला हवा, तरच उरलीसुरली नैतिकता टिकून राहील !