बेळ्तंगडी (कर्नाटक) – येथील बेकायदा पशुवधगृहावर धाड घालून पोलिसांनी ८७ किलो गोमांस कह्यात घेतले. या प्रकरणी बद्रुद्दीन, अब्दुल रहमान, खलील आणि इक्बाल या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना बेळ्तंगडी तालुक्यातील कुवेट्टू गावात असलेल्या आरमले बेट्ट येथे घडली आहे.
अरमले बेट्ट येथील बद्रुद्दीन हा त्याच्या घराच्या मागील बाजूस जनावरांची हत्या करत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर के.जी. आणि पोलीस कर्मचारी यांनी तेथे धाड घातली. या वेळी विकण्यासाठी गोळा करून ठेवलेले अनुमाने ८७ किलो गोमांस, तसेच त्यासाठी वापरलेली हत्यारे कह्यात घेण्यात आली.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमान हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठीच गोहत्या करतात, हे जाणा ! अशांच्या मुसक्या आवळण्यासाठी परिणामकारक गोहत्याबंदी कायदा झाला पाहिजे. यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |