हावरटपणाची किंवा संचयाची वृत्ती व्यावहारिक जीवनातदेखील आत्मघात घडवून आणते. श्रीमंतीचा लोभच माणसाला चोरांच्या भक्ष्यस्थानी आणतो. आमिषाच्या प्रलोभनामुळे मासा आकड्यात अडकतो, तसेच मधमाशी संचयाच्या प्रवृत्तीमुळेच एक दिवस जाळली जाते. अपरिग्रह (संग्रह न करणे) भौतिक तथा आध्यात्मिकदृष्ट्या तारक ठरतो.’
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)