बेंगळुरू येथे धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केलेल्या हिंदु तरुणावरच गुन्हा नोंद !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे १७ मार्च या दिवशी भ्रमणभाषच्या दुकानात हनुमान चालिसा लावल्यावरून दुकानचालक मुकेश यांना काही धर्मांध मुसलमान तरुणांनी मारहाण केली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी मुकेश यांच्यावरच गुन्हा नोंदवल्याचे वृत्त आहे. मारहाणीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींपैकी एक असणार्‍या सुलेमान याच्या आईने मुकेश यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर न्यायालयाच्या अनुमतीनंतर मुकेश यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, मुकेश ३-४ दिवसांपासून जोरात ध्वनीक्षेपक लावत होता. त्याची विचारणा माझा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी केल्याने मुकेशकडून त्यांच्यावर आक्रमण करून शिवीगाळ करण्यात आली. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! मुकेशला मारहाण केल्याचा व्हिडिओ भारतभरात प्रसारित झाला. असे असतांना अशा प्रकारे धादांत खोटे आरोप करणार्‍या धर्मांध मुसलमान महिलेवर खरेतर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे याहून वेगळे काय होणार ?