एका विद्यार्थ्याकडून चाकूने दुसर्यावर आक्रमण याच महाविद्यालयातील अशा प्रकारची ही दुसरी घटना !
पणजी : बांबोळी येथील कुजिरा महाविद्यालय परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारीचा प्रकार घडला. या वेळी एका विद्यार्थ्याने दुसर्यावर चाकूने आक्रमण केल्याचीही घटना घडली. ३ एप्रिलला सकाळी हा प्रकार घडला असून या वेळी काही दुचाकी आणि अन्य वाहनांची हानी झाली. दीड वर्षांपूर्वीही असाच प्रकार याच महाविद्यालयात घडला होता.
विद्यार्थ्यांमधील वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनी ते थांबवले; मात्र नंतर काही वेळाने पुन्हा तोच प्रकार घडला. तेव्हा एका विद्यार्थ्याने चाकू दाखवून मारण्याची धमकी दिली आणि आक्रमण केले. यात दुसरा मुलगा थोडक्यात बचावला. या प्रकाराची माहिती काही जणांनी लगेच पोलिसांना दिल्यावर पोलीसही घटनास्थळी पोचले. चाकूने आक्रमण करणार्या विद्यार्थ्याची ओळख पटली असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे. अटक टाळण्यासाठी तो लपून बसला असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.
संपादकीय भूमिकानैतिकतेचे धडे केवळ पुस्तकापुरतेच शिल्लक राहिले असल्याने ते मुलांमध्ये रुजवण्यासाठी पालक, शिक्षक यांसह सरकारनेही प्रयत्न करणे अत्यावश्यक झाले आहे ! |