‘विज्ञापन आणि अर्पण घेणे, या सेवांशी संबंधित सेवा करणार्या पू. रत्नमाला दळवी, सुश्री (कु.) स्मिता जाधव (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे) आणि सौ. तनुजा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३५ वर्षे) यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. तत्परता
पू. रत्नमाला दळवी, कु. स्मिता जाधव आणि सौ. तनुजा गाडगीळ यांच्या सेवेची व्याप्ती अधिक असूनही मला त्यांच्याकडून हवी असलेली माहिती लगेच उपलब्ध होते.
२. स्थिरता
त्या तातडीच्या सेवा करत असल्या, तरीही त्या मला हवी असलेली माहिती लगेच देतात. त्या वेळी त्यांच्या चेहर्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिसत नाही. त्यामुळे मला सेवा करतांना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.
३. सेवाभाव
अ. ‘मी दुसर्या साधिकेला विचारून सांगते’’, असे त्यांनी मला कधीही सांगितले नाही. त्यांना एकमेकींच्या सेवेविषयी ठाऊक असते.
आ. ‘त्या एकमेकींशी आणि सेवेशी एकरूप झाल्या आहेत’, असे मला वाटते.
४. त्यांचे शांतपणे बोलणे आणि हसतमुख चेहरा पाहून मला आनंद जाणवतो.
गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) अशा गुणी साधिकांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मला कृतज्ञता वाटते.’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |