प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
ध्रुव अरण्यात जातो. त्याला काहीच ठाऊक नसते. त्याच्या आईने त्याला सांगितलेले असते, ‘देव अरण्यात असतो.’ वाघ दिसल्यावर ध्रुव त्याला विचारतो, ‘अरे बाबा, तू देव पाहिलास का ?’ वाघ खाईल म्हणून वाघाचे त्याला भय वाटत नाही. वाघ जवळ येतो मान हलवतो, काही तरी करतो अणि निघून जातो. तोच प्रश्न अजगराला विचारतो, सापाला विचारतो, उंदराला विचारतो. भय कुठे आहे. त्याला ठाऊकच नाही वाघ कोण आहे ? ‘ज्याला भय नाही निर्भय आहे तो.’ अद्वैतात फक्त निर्भयता आहे. दुसरा आला की, भय आहे.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१८)