देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) नलिनी राऊत व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

‘मार्च २०२२ पासून आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) नलिनी राऊत घेत आहेत. त्या वेळी जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. नलिनी राऊत

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. नलिनीताईंना त्यांच्या आजारपणामुळे शारीरिक सेवा करायला जमत नाही, तरी त्या अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने त्यांना जमेल ती सेवा करतात. त्यांच्याकडे अनेक सेवा असूनही त्या आम्हाला आनंदाने वेळ देतात.

१ आ. नामजपादी उपायांचे गांभीर्य : ज्या दिवशी नलिनीताई आमच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात, त्या दिवशी त्यांना नामजपादी उपाय करायला वेळ मिळत नाही; म्हणून त्या रात्री १.३० – २ वाजता उठून नामजप पूर्ण करतात.

१ इ. व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना ‘साधकाला साहाय्य व्हायला हवे आणि त्याची साधना चालू राहिली पाहिजे’, असा त्यांचा भाव असतो.

१ ई. आम्ही घडलेले प्रसंग आणि मनातील विचार आढाव्यात सांगतो. तेव्हा त्या शांतपणे आणि मनापासून ऐकून घेतात अन् आम्हाला अत्यंत प्रेमाने आणि आपलेपणाने योग्य दृष्टीकोन देऊन त्यातून बाहेर काढतात.

कु. स्वाती बाळकृष्ण शिंदे

२. सुश्री (कु.) नलिनीताई व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

२ अ. नलिनीताई आढावा घेत असतांना गारवा जाणवतो आणि वातावरणात हलकेपणा जाणवतो.

२ आ. आढावा चालू असतांना माझे मन निर्विचार होऊन मला उत्साह जाणवतो.

२ इ. आम्ही आढाव्यात परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व अनुभवतो आणि आम्हाला वेगवेगळ्या अनुभूती येतात.

२ ई. बोलणे ऐकून भावजागृती होणे

१. त्या जेव्हा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याविषयी बोलतात, तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून आम्हा साधकांचा भाव जागृत होतो आणि ‘आम्ही किती प्रयत्न करायला हवेत !’, याची आम्हाला जाणीव होते.

२. नलिनीताई नेहमी सांगतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्या सर्व साधकांसाठी किती करत असतात ! असे कुणीही करू शकणार नाही.’’ त्या वेळी माझी भावजागृती होते.

३. सुश्री (कु.) नलिनी राऊत यांना आलेली अनुभूती

रात्री झोपल्यावर त्यांचे पाय आणि मांड्या यांमध्ये गोळे येऊन पाय दुखतात. तेव्हा त्या केवळ ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असे म्हणतात आणि त्यांचे पाय दुखायचे थांबतात.

‘प.पू. गुरुमाऊली, ‘नलिनीताईंसारखी तळमळ माझ्यामध्ये निर्माण होऊ दे. मला सतत शिकण्याच्या स्थितीत राहून शिकता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी आर्त प्रार्थना करते.’

– कु. स्वाती बाळकृष्ण शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.४ २०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक