मुडीपू (कर्नाटक) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता संपूर्ण देशात लागू करण्यात आली असून त्याचे उल्लंघन करून २९ मार्चला संध्याकाळी ६ वाजता उळ्ळाल तालुक्यातील मुडीपू पेठेतील जोड रस्ता अडवून मुसलमानांनी इफ्तार पार्टी केली. यामुळे संध्याकाळी घरी परतणारी मुले आणि महिला यांना पुष्कळ अडचण आली. ‘निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्त यांनी कृपया तत्परतेने यासंदर्भात गुन्हा प्रविष्ट (दाखल) करून गुन्हेगारांविरुद्ध कायदेशीर उपाययोजना करावी’, असा आग्रह ‘हिंदु जागरण वेदिके’ने केला आहे. यानंतर निवडणूक आयोगाने इफ्तार पार्टीचे आयोजन करणार्या अबुबकर सिद्दीकी याला नोटीस बजावली आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने याहून वेगळे काय होणार ? |