|
कोटा (राजस्थान) – कोटा जिल्ह्यातील कैथुन शहरात २९ मार्च या दिवशी स्थानिक जत्रेमध्ये रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘रामलीला’ पार पडल्यानंतर ‘राम बारात’ मिरवणूक काढण्यात आली होती. उत्तरभारतातील अनेक भागांत ‘रामलीला’ झाल्यानंतर श्रीराम आणि सीतामाता यांचा विवाह लावून नंतर वरात काढली जाते. त्याला ‘राम बारात’ असे म्हणतात. ही ‘राम बारात’ मशिदीजवळ पोचल्यावर मुसलमानांनी तिच्यावर आक्रमण केले, तसेच डिजे यंत्रणेची (मोठ्या ध्वनीक्षेपक यंत्रणेची) तोडफोड केली. यात हिंदु महिला आणि पुरुष घायाळ झाले. यानंतर संतप्त लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून मुसलमानांवर कारवाई करण्याची मागणी करत निदर्शने केली. त्यांनी घोषणाबाजी केल्यावर पोलिसांनी त्यांना हटवण्यासाठी लाठीमार केला. या हिंसाचाराच्या प्रकरणी काही जणांना कह्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१. याप्रकरणी ग्रामीण पोलीस अधीक्षक करण शर्मा यांनी सांगितले की, राम बारात मिरवणूक मशिदीसमोरून जात होती. या वेळी नमाजपठण चालू होते. मिरवणुकीतील डिजेवरून वाद झाला. कुणीतरी डिजेच्या वायर्स काढल्या. यावरून बाचाबाची होऊन हिंसाचार झाला.
२. विहिंपचे सह-प्रांतीय मंत्री योगेश रेणवाल म्हणाले की, राम बारात मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांवर झालेल्या आक्रमणानंतर पीडितांनी मुसलमानांवर कारवाई करण्याची मागणी केली असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. पोलिसांनी निःपक्षपातीपणे कारवाई न केल्यास कैथून शहर बंद ठेवून निदर्शने करण्यात येतील.
संपादकीय भूमिका
|