लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना करावा लागणार वाढीव निवडणूक खर्च !

  • शाकाहारी जेवण ११२ रुपये, तर मांसाहार २२४ रुपये थाळी

  • ढोल-ताशांसाठी २ सहस्र ४०० रुपये !


नागपूर
– लोकसभा निवडणूक काळात निवडणूक आयोगाने विविध गोष्टींवर व्यय करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित केली आहे. यात खाण्यापिण्यापासून निवडणूक साहित्य विक्रीच्या साहित्याचा समावेश आहे. याचा तपशील निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाचे खर्चाचे शुल्क १२ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. यात शाकाहारी जेवणासाठी १०० ऐवजी ११२ रुपये आणि मांसाहारासाठी २२४ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. चहा, कॉफी, लस्सी, थंड पेये, तसेच अल्पाहार यांचेही शुल्क वाढवण्यात आले आहे.

उमेदवाराला ९५ लाख रुपयांची मर्यादा !

वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ७५ लाख रुपये होती. आता ती ९५ लाख रुपये करण्यात आली आहे. सिक्कीमसारख्या छोट्या राज्यात मात्र आजही ७५ लाख रुपयेच मर्यादा आहे. आवेदन केल्यापासून ते निकाल लागेपर्यन्तचा व्ययाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे. आवेदन भरतांना उमेदवाराला २५ सहस्र रुपये अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात निवडणूक कक्ष सिद्ध करण्यात आला आहे.

असे आहे शुल्क…