‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’च्या निमित्ताने पुणे येथील पत्रकार परिषद !
पुणे – स्वयंसेवक हे शाखा विस्तारासाठी कार्यरत रहाणार असून देशामध्ये १ लाख शाखांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहातील. ‘स्व’ आधारित व्यवस्था, पर्यावरण, सामाजिक, समरसता, कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य या ‘पंच परिवर्तना’च्या सूत्रांवर आधारित स्वयंसेवक आगामी काळात कार्य करतील, अशी माहिती ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेशनाना जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभा’ १५ ते १७ मार्च या कालावधीमध्ये नागपूर येथे झाली. देशभरातून ३२ संघटनांचे १ सहस्र ४६५ प्रतिनिधी या सभेमध्ये सहभागी झाले होते. त्यांना सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत आणि सरसहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी मार्गदर्शन केले. या सभेच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. सुरेशनाना जाधव बोलत होते.
सौजन्य : puneri awazz
जाधव म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र प्रांतात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक येथे ८ सहस्र ४३४ गावांमध्ये ६४ लाख ७२ सहस्र ९७६ गृह संपर्क झाले. पुणे शहरातील १३ लाख कुटुंबाशी संपर्क केला. देशभरामध्ये ‘श्रीराम अक्षता वितरण अभियाना’तून ९ लाख ८५ सहस्र ६२५ उपक्रम राबवण्यात आले. त्यातून २७ कोटी ८१ लाख ५४ सहस्र ६६५ नागरिकांशी संपर्क साधण्यात आला.