‘भ्रष्टाचारी अभय योजना’ ही नवीन योजना आहे का? – उद्धव ठाकरे

गुहागर आणि दापोली येथे जनसंवाद सभा

उद्धव ठाकरे

रत्नागिरी – शिवसेना आणि कोकण यांचे नाते घट्ट आहे. मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत होतो; म्हणून आपले सरकार गद्दारी करून पाडले. त्यांच्या हिंदुत्वामध्ये शिव्या आहेत, आमच्याकडे ओव्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नावाने अनेक योजना चालू आहेत. तशी त्यांनी आता नवीन ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ काढली आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी भाजपमध्ये यावे, आम्ही तुम्हाला अभय देतो, ही गॅरंटी (हमी) आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

गुहागर येथे जनसंवाद सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर खासदार अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दापोली येथेही उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद सभा घेतली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१. विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार ! मग १० वर्षे यांनी काय केले ?

२. त्यांची ४०० पार करण्याची घोषणा म्हणजे देशाची घटना पालटून हुकूमशाही आणण्याचा डाव आहे.

३. माझ्या शिवसैनिकांना विनाकारण त्रास द्याल, तर आमचे सरकार आल्यावर कायद्याचे फटके काय असतात ? ते दाखवू.

४. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले नसते, तर आज संपूर्ण कोकणात गुंडागर्दी झाली असती.

५. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासारखे काही लोक आहेत; म्हणून ही लोकशाहीची शेवटची धाकधुक चालू आहे.