खलिस्तानी आणि गुंड यांच्या संबंधांच्या प्रकरणात कारवाई
नवी देहली /जयपूर – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) खलिस्तान समर्थक गुंडांच्या संदर्भात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांसह केंद्रशासित प्रदेश चंडीगड येथे धाडी घातल्या. एकूण ३० ठिकाणी या धाडी घालण्यात आल्या.
National Investigation Agency raids 30 locations in 4 States
Probe regarding the connection between #Khalistanis and Criminals#NIARaid #Khalistan pic.twitter.com/x4WjG4NCtt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 12, 2024
कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या गुंडांच्या ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गुन्हेगारी कृत्यांमागे परदेशातील आतंकवादी संघटना संघटित गुन्हेगारी टोळ्यांसमेवत काम करत असल्याची माहिती एन्.आय.ए.ला यापूर्वी मिळाली होती.