चेन्नई (तमिळनाडू) – श्रीलंकेच्या नौदलाने १० मार्चला सकाळी ७ भारतीय मासेमारांना श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये मासेमारी केल्याच्या आरोपावरून अटक केली. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेच्या नौदलाने पकडलेल्या ६ भारतीय मासेमारांची सुटका करण्यात आली होती.
मासेमारांवरील कारवाईच्या घटनांबद्दल चिंतित ! – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी राज्यातील मासेमारांवरील कारवाईवरून चिंता व्यक्त केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून समस्या लवकरात लवकर सोडवण्याची विनंती केली.
संपादकीय भूमिकाभारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती मासेमारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते ! |