खडकत (जिल्हा बीड) येथील ५ अवैध पशूवधगृहांवर कारवाई !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता सांगणारी घटना !

(प्रतिकात्मक चित्र)

बीड – आष्टी तालुक्यातील खडकत येथे अनेक वर्षांपासून चालू असलेल्या ५ अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यात आली आहे. महसूल, पोलीस आणि ग्रामविकास विभाग यांच्या कारवाईत ही ५ पशूवधगृहे भुईसपाट करण्यात आली आहेत. या वेळी आष्टीचे नायब तहसीलदार बालदत्त मोरे, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ उपस्थित होते. (प्रशासनाने कठोर पावले उचलली, तर अवैध पशूवधगृहे वाढणार नाहीत. – संपादक)

यापूर्वी पोलिसांनी अनेकदा पशूवधगृहांवर धाड घालून मोठ्या प्रमाणात गोवंशीय मांस जप्त करून सहस्रो गोवंशियांची सुटका केली आहे. महसूल आणि ग्रामविकास विभाग यांनी सूचना देऊनही त्यांना न जुमानता येथे अवैधरित्या पशूवधगृहे चालू होती. मागील अनेक महिन्यांच्या मागणीस यश आल्याने मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी समाधान व्यक्त केले आहे.