|
छत्रपती संभाजीनगर – चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी या दिवशी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती. ‘तेलंगाणातील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह हे प्रक्षोभक आणि द्वेषमूलक वक्तव्य करतात’, असे कारण देत पोलिसांनी अनुमती नाकारली. या सभेची अनुमती घेण्यासाठी सकल हिंदु समाजाने २५ जानेवारी या दिवशी, म्हणजे सभेच्या २७ दिवस आधीच पोलिसांकडे निवेदन दिले होते; परंतु पोलिसांनी सभेच्या २ दिवस आधी अनुमती नाकारली. याविषयी सकल हिंदु समाजाच्या वतीने सर्वश्री अनिल वानखेडे आणि राजाराम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट केली.
२० फेब्रुवारी या दिवशी उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेऊन हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यास अनुमती दिली आहे. याविषयी न्यायालयाने चोपडा पोलिसांना तसा लेखी आदेशही दिला आहे. या वेळी न्यायालयात याचिकेवर संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता कुलकर्णी आणि अधिवक्ता भडगावकर यांनी युक्तीवाद केला.
Bombay High Court’s green signal for Hindu Rashtra-Jagruti Sabha today in Chopda (Jalgaon)
➡️ Permission granted by the Sambhajinagar bench of Mumbai High Court
➡️ Police had initially denied permission@HinduJagrutiOrg @TigerRajaSingh pic.twitter.com/iXvLt10xkM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 20, 2024
न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपिठाने अधिवक्त्यांचा युक्तीवाद लक्षात घेऊन २१ फेब्रुवारी या दिवशी होणार्या सभेला अनुमती नाकारणारा आदेश रद्दबातल (रहित) ठरवला आणि ‘सभेस अनुमती द्या’, असा लिखित आदेश पोलीस अधिकार्यांना दिला. ‘पोलीस अधिकारी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काही अटी घालू शकतात’, असेही न्यायालयाने नमूद केले, अशी माहिती श्री. अनिल वानखेडे यांनी दिली.