कारवाईसाठी ‘हिंदु एकता आंदोलना’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा पुढाकार !

कोल्हापूर – हिंदु युवतींना भूतबाधा आणि करणी यांची भीती दाखवून त्यांना ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात ओढणारा भोंदू पीरबाबा नदीम शेख याला हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी पकडून जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी नदीम शेखवर ‘पोक्सो’च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (विविध प्रकारे सातत्याने हिंदु युवतींची होणारी फसवणूक पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरविरोधी कठोर कायद्या’ची आवश्यकता आहे, हेच लक्षात येते ! – संपादक) या प्रसंगी हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर आणि श्री. वैभव कवडे, सर्वश्री राज पेंडुरकर, विवेक भोगम, मंथन भोगन, आनंदराव कवडे, सुधीर खराडे, स्वयम् केरूळे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या संदर्भात श्री. दीपक देसाई आणि श्री. गजानन तोडकर म्हणाले, ‘‘नदीम शेख हा गरीब हिंदु कुटुंबातील युवतींना हेरून त्यांना त्यांच्या धर्मातील मैत्रिणींकडून भूतबाधा आणि करणी यांची भीती घालत असे. पुढे जाऊन या हिंदु युवतींना हा पीरबाबा टिकली लावण्यास मनाई करून ‘डोळ्यात सुरमा घालत जा’, असे सांगत असे. ‘माझ्या अंगात पीर येतो, मी झाड आहे. मी भूत उतरवतो’, असे सांगून नशेची औषधे देऊन हिंदु युवतींचे शारीरिक शोषण करत असे. हे सर्व होत असतांना कोल्हापूर येथील तथाकथित पुरोगामी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो असे सांगणारे कुठे आहेत ? अंधश्रद्धा निर्मूलनावाल्यांना ‘हा झाडाचा प्रकार दिसत नाही का ? धर्माच्या नावावर चालणारे हे अपप्रकार दिसत नाहीत का ? तरी यापुढे कुणाला अशाप्रकारे फसवणूक झाली आहे’, असे वाटल्यास त्यांनी मिरजकर तिकटी येथील हिंदु एकताच्या कार्यालयात संपर्क करावा. या पीरबाबाच्या जाळ्यात अजून किती युवती अडकल्या आहेत ? याचे सखोल अन्वेषण करावे, या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना लवकरच देण्यात येणार आहे.’’
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
भारतीय धर्मग्रंथांचे साम्यवादी दृष्टीने अर्थ लावून हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र रचणारे शेल्डन पॉलॉक !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !