(म्हणे) ‘मोदी पंजाबात आले, तर ते वाचणार नाहीत !

पंतप्रधानांना धमकी देणार्‍या कथित शेतकर्‍याचा व्हिडिओ प्रसारित !

पंतप्रधान मोदी

नवी देहली – पंजाबमधून आलेले आंदोलक शेतकरी देहली जवळील शंभू सीमेवर जमले आहेत. प्रशासनाकडून त्यांची समजूत काढण्याचा आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न चालू आहेे. अशातच शंभू सीमेवरून एका कथित शेतकर्‍याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो पंतप्रधान मोदी यांना ‘जर मोदी पंजाबमध्ये आले, तर आम्ही त्यांना अश्रूधुराचे दर्शन घडवू. मागच्या वेळी ते फिरोजपूरहून पळून गेले होते. या वेळी जर ते आले, तर ते सुटणार नाहीत’ अशा शब्दांत धमकी देतांना दिसत आहे.

१. ‘सत्य खबर’ या ‘यूट्यूब चॅनल’ने १२ फेब्रुवारी या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित केला  होता. या व्हिडिओमध्ये काही शीख लोक खलिस्तानची मागणी करतांना दिसत आहेत. शिखांपैकी एक जण म्हणतो, ‘‘आम्ही सिंधू सीमेवर उभे आहोत, जिथे तुम्ही लोकांनी बॅरिकेड्स (लोकांनी पुढे जाऊ नये; म्हणून प्रशासनाने रस्ता अडवण्यासाठी लावलेले एक प्रकारचे अडथळे) लावले आहेत. एक काम करा; हरियाणाची सीमा कायमची बंद करा. आम्ही पाकिस्तानसमवेतची सीमा उघडी करू. तुम्ही लोकांनी आम्हाला भारतापासून वेगळे केले; म्हणून आता आम्ही वेगळे होऊ.’’

२. अन्य एक शेतकरी म्हणाला, ‘‘मोदी सरकार पंजाबला आपले मानत नाही. आम्ही वेगळा खलिस्तान बनवू. आम्ही पाकिस्तानशी हातमिळवणी करू. आम्ही भिंती बांधल्या नाहीत, तुम्ही बांधल्या. तुम्ही आम्हाला भारतापासून वेगळे केले आहे. आता आम्ही खलिस्तान निर्माण करू.’’

३. दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये, ट्रॅक्टरवर स्वार झालेला निहंग शीख म्हणतो, ‘‘शेतकर्‍यांची फौज येत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत देहलीत प्रवेश करू.’’

संपादकीय भूमिका

  • शेतकर्‍यांच्या नावाखाली जर समाजकंटक द्वेष पसरवत असतील, तर सरकारने अशांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !