हल्द्वानीमध्ये जेथे अतिक्रमण पाडण्यात आले, तेथे पोलीस ठाणे बांधणार !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

डेहराडून (उत्तराखंड) – आता हल्द्वानीच्या बनभूलपुरा येथे ज्या ठिकाणी बेकायदाशीर असलेले बांधकाम हटवण्यात आले, त्याच ठिकाणी पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे. देवभूमीच्या शांततेशी खेळणार्‍या कुणालाही सोडले जाणार नाही, हा आमच्या सरकारचा भ्रष्ट आणि दंगलखोर यांना स्पष्ट संदेश आहे. उत्तराखंडमध्ये अशा बदमाशांना जागा नाही, अशा शब्दांत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सामाजिक माध्यमांतून पोस्ट करून धर्मांध मुसलमानांना सुनावले आहे.

काही दिवसांपूर्वी येथे अतिक्रमण हटवण्यावरून धर्मांधांनी दंगल घडवली होती. यात ५ जण ठार, तर १०० हून अधिक पोलीस घायाळ झाले होते.