पुणे जिल्ह्यातील विवाहितेवर धर्मांधांचा मिरजेत सामूहिक बलात्कार !

कर्नाटकात विक्री केल्याची धक्कादायक घटना उघड : ७ जणांना अटक

मिरज – पुणे जिल्ह्यातील हिंदु विवाहितेवर ५ जणांनी मिरज आणि कर्नाटकातील जमखंडी येथे सामूहिक बलात्कार करून तिची कर्नाटक येथे ४ लाख रुपयांना विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मिरजेतील गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून बलात्कार करणारे ५ धर्मांध आणि अन्य २ दोघे अशा ७ जणांना अटक करण्यात आली आहे. महंमद हुसेन तथा मच्छर हनी सिंह महंमद गौर शेख, अबुजा फारुख जमादार, महंमद साजीश शमशुद्दीन मुल्ला, महंमद उपाख्य सर्व शेरखान फकीर, खालीद मुबारक कोरबू, तसेच त्यांना साहाय्य करणारे जुबेद उपाख्य कपाला शब्बीर शेख, संतोषी नाशिककर उपाख्य किरण फकीर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील २ महिला पसार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

सौजन्य एबी न्यूज मराठी 

१. पुण्यातील विवाहित महिला घरी भांडण झाल्याने तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ने कराड येथे निघाली होती. वाटेत तिला झोप लागल्याने ती कराड येथे उतरू शकली नाही आणि मिरज रेल्वेस्थानकावर आल्यावर पहाटे तिला जाग आली.

२. तेथून कराड येथे जाण्यासाठी रेल्वेगाडी लगेच नसल्याने ती रेल्वे स्थानकाच्या बाहेर आली. जवळ भ्रमणभाष नसल्याने तिने एका व्यक्तीकडून भ्रमणभाष मागून घेऊन तिच्या पतीला भ्रमणभाष केला. त्या वेळी पतीने भ्रमणभाष उचलला नाही. त्यामुळे ती परत मिरज रेल्वे पुलाच्या खाली येऊन थांबली. या वेळी संशयित मच्छर हनी सिंह आणि त्याच्या इतर साथीदारांनी तिचे अपहरण करून जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

३. या महिलेला रेल्वे पुलाजवळ असणार्‍या एका पत्र्याच्या खोलीत कोंडून आणखी एकाने बलात्कार केला.

४. यानंतर वरील संशयित आरोपींनी मिरजेतील एका महिलेच्या साहाय्याने कर्नाटक येथे नेऊन तिला ४ लाख रुपयांना विकले, तसेच तिचा बळजोरीने विवाह लावून दिला. मधल्या कालावधीत पीडिता पुण्यातून हरवल्याची तक्रार प्रविष्ट झाली होती.

५. काही कालावधीनंतर संबंधित महिला जमखंडी येथून तिची सुटका करून घेण्यात यशस्वी झाली आणि तिने पुणे येथे येऊन झालेल्या प्रकाराविषयी पोलिसात तक्रार दिली. पुणे पोलिसांनी हा गुन्हा मिरज पोलिसांकडे वर्ग केला. यानंतर गांधीनगर पोलिसांनी शोध घेऊन वरील आरोपींना अटक केली. (या संपूर्ण घटनाक्रमातून समाजात महिलांची स्थिती किती भयावह झाली आहे ? हे लक्षात येते. – संपादक)

संपादकीय भूमिका 

अशा भयंकर घटना रोखण्यासाठी पोलीस त्यांचा धाक कधी दाखवणार ?