
अकोला – आज देशात लव्ह जिहाद, लँड जिहाद अशा अनेक जिहादांनी हैदोस घातला आहे. धर्मांतराच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राला भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र चालू आहे. तरुण मुले आणि मुलींना अमली पदार्थांचे व्यसन लावून, भीती दाखवून, सामाजिक माध्यमांद्वारे जाळे रचून, तसेच चित्रपटांद्वारे सुद्धा भरकटवले जात आहे. हिंदु आताही जागृत झाला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र नष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील ‘सुराज्य’ निर्माण करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन गुजरातच्या व्याख्यात्या काजलदीदी हिंदुस्थानी यांनी केले. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात सकल हिंदु समाज यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘वीर-वीरांगना संमेलना’मधील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला महिला आणि तरुणी यांची बहुसंख्य उपस्थिती लाभली.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमापूर्वी महिला आणि तरुणी यांनी २ किलोमीटरपर्यंत भव्य मशाल दिंडी काढली.
२. सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. ‘जानकी सिड्स’ या आस्थापनाचे संचालक धर्मप्रमी श्री. संजय ठाकूर शेवटपर्यंत ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी महिलांना लव्ह जिहाद विषय समजावून सांगून ग्रंथ घेण्यास प्रोत्साहित केले.
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Love Jihad Planned Conspiracy : ५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !