पुणे – नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ काँग्रेस (एन्.एस्.यू.आय.) या काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस भवनमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्यास गेलेले माजी आमदार आणि माजी नगरसेवक यांना धक्काबुक्की झाली. ‘एन्.एस्.यू.आय.’च्या शहराध्यक्षपदावरून गेले काही मास वाद चालू असून त्याचे भांडणात रूपांतर झाले. शहराध्यक्षपदावरून, तसेच सदस्य करण्याचे अधिकार कुणाला आहेत, यावरून कार्यकर्त्यांमध्ये वादावादी चालू झाली. हे वाद विकोपाला जाऊ नयेत; म्हणून माजी आमदार दीप्ती चौधरी आणि नगरसेवक अजित दरेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की झाली.
संपादकीय भूमिका :
|