‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना साधकाला आलेल्या अनुभूती

अधिवक्ता योगेश जलतारे

१. ‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ध्वनीक्षेपकावर ‘निर्विचार’ हा नामजप लावला होता. नामजपाला आरंभ झाल्यावर आरंभी माझे मन एकाग्र होत नव्हते.

२. थोड्या वेळाने माझे डोके जड झाले आणि माझ्या भ्रूमध्यावर संवेदना जाणवू लागल्या.

. त्यानंतर माझ्या श्वासाची गती मंद होत जाऊन ‘काही क्षण श्वास बंद झाला कि काय ?’, असे मला वाटले. त्या वेळी ‘काळ पूर्णपणे थांबला आहे’, असे मला वाटत होते. माझ्या मनातील विचार पूर्णपणे थांबले होते.

४. नंतर माझे लक्ष ‘निर्विचार’ या शब्दाच्या ध्वनीवर केंद्रित झाले. तेव्हा तो ध्वनी मला माझ्या कानांनी ऐकू येत नव्हता; परंतु मला तो जप मात्र स्पष्टपणे ऐकू येत होता. ‘कानांनी न ऐकू येता जप कसा काय ऐकू येत आहे ?’, असे कुतूहल माझ्या मनात निर्माण झाले. तेव्हा ‘निर्विचार’ हा ध्वनी आसमंतात कुठेतरी घुमत आहे आणि आकाशवाणीप्रमाणे तो दूरवरून ऐकू येत आहे’, असे माझ्या लक्षात आले.’

– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक