मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून २२ लाख ७० सहस्र ५०० रुपयांचा ऐवज चोरला

अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद

खेड – कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून २२ लाख ७० सहस्र ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १ फेब्रुवारी या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे स्थानकाजवळ घडली. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी रमा सुरेंद्र माडा, वाशी, नवी मुंबई यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.

रमा माडा या उडीपी ते एलटीटी असा मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीने प्रवास करत असतांना खेड रेल्वेस्थानक गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्समध्ये २२ लाख ७० सहस्र  ५०० रुपयांचा ऐवज, तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, चेक बुक, २ ए.टी.एम्. कार्ड, पासबुक आदी चोरून नेले.