‘१८.९.२०२२ या दिवशी रात्री मी देवद आश्रमातून घरी आले. तेव्हा मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा आमच्यात सूक्ष्मातून पुढील काव्यात्मक संवाद झाला.
मी म्हणाले,
श्रीकृष्णा, आम्ही नेहमीच येतो तुझ्या गाभार्यात ।
तू येशील का रे माझ्या मनोगाभार्यात ।। १ ।।
श्रीकृष्ण म्हणाला,
कसा अन् कधी येऊ मी सांग ।
तुझ्या मनात तर लागली आहे विचारांची रांग ।। २ ।।
स्वभावदोष अन् अहं यांची बघ आहेत किती जळमटे ।
मन तुझे झाले आहे पुष्कळ खरकटे ।। ३ ।।
प्रतिक्रिया अन् पूर्वग्रह यांची साचली आहे धूळ ।
अपेक्षांचा बघ बसला आहे राप ।। ४ ।।
स्वच्छता करून नामस्मरणाचे रोप लाव ।
त्याला भक्तीभावाचे पाणी घाल ।। ५ ।।
श्रद्धेचे खत घाल ।
सत्सेवेचा घाम गाळ ।। ६ ।।
मग बघ, रोपाला भावाची सुगंधी फुले येतील ।
आणि भक्ताच्या भेटीला देव धावत येईल ।। ७ ।।
मी म्हणाले,
हो रे कृष्णा, प्रयत्न करण्याची शक्ती तूच दे रे भगवंता ।
माझ्यात साधनेची तळमळ तूच निर्माण कर ।। ८ ।।
श्रीकृष्णा, जशी झाली तुझी आणि सुदाम्याची भेट ।
अगदी तशीच होईल ना आपली भेट ।। ९ ।।
श्रीकृष्ण म्हणाला,
हो, तशीच होईल आपली भेट ।
|