ज्ञानवापीविषयी मुसलमानांनी सामंजस्य दाखवावे !(Gyanvapi Muslim Cooperation Expected)

  • प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे आवाहन

  • मंगलमय वातावरणात आणि वेदांच्या घोषामध्ये महाराजांच्या पंचाहत्तरीच्या महोत्सवाचा प्रारंभ !

डावीकडून डॉ. संजय मालपाणी, बोलतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज, श्री. गिरीधर काळे आणि डॉ. आशु गोयल

आळंदी (पुणे), ४ फेब्रुवारी (वार्ता.) – ज्ञानवापीच्या संदर्भात मुसलमानांनी सामंजस्याची भूमिका ठेवल्यास भव्य मंदिराचा मार्ग मोकळा होईल. अशाच प्रकारे भूमिका मथुरा येथे ठेवल्यास तेथेही मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा होईल. हिंदु समाजाकडून या स्थानांची मागणी करण्यात येत आहे. आम्हाला केवळ ३ मंदिरे हवी होती, असे उद्गार प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी येथे काढले. प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’ला आज येथे प्रारंभ झाला. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज पुढे म्हणाले की,

१. विश्‍व हिंदु परिषदेचे अशोक सिंघल यांनी सांगितले होते की, आक्रमणकर्त्यांनी ३ सहस्र ५०० मंदिरे तोडून मशिदी बांधल्या. आक्रमणकर्त्यांनी केलेल्या अपमानाच्या चिन्हांमध्ये पालट करायचा आहे. त्यांची निशाणे मिटवायची आहेत.

२. हिंदु-मुसलमान असा धार्मिक वाद नाही. आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. हिंदू न्यायप्रिय असून शांतताप्रिय आहेत. ज्ञानवापीमध्ये न्यायालयाने सांगितल्यानुसार तिथे पूजा चालू आहे. समोरच्या लोकांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न करत आहोत.

३. ज्या ठिकाणी समजून प्रश्‍न सुटत आहेत, त्या ठिकाणी असे प्रयत्न चालू आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये देशामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण व्हायला नको.

मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी वेदांची आवश्यकता !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज पुढे म्हणाले की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा विचार विश्‍वकल्याणाचा आहे. श्रीमद्भगवद्गीता ही वेदांचा निष्कर्ष आहे. ज्ञानेश्‍वर हे समन्वयाची मूर्ती आहेत. श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून भक्तीची गंगा वाहिली आहेे. मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी वेदांची आवश्यकता आहे. आता मला कोणत्याही सन्मानाची आवश्यकता नाही. काही वेळेस पाठिब्यांची आवश्यकता होती. माझा वाढदिवस साजरा करण्याची सहकार्‍यांनी विनंती केली. तेव्हा ‘गीताभक्ती, धार्मिक वातावरण, संस्कारमय शिक्षण देण्यासाठीचे कार्यक्रम आयोजित करूया’, असे मी सांगितले. पूजापाठ, पारायण, होम-हवन, फुले वहाणे ही धर्माचा एक भाग आहे. जीवनमूल्ये आचारणात आणणे आवश्यक असून ती पुढल्या पिढीला देणे, हा कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश आहे.