सर्वेक्षणानंतर पुरातत्व विभागाने प्रथमच बनवला ज्ञानवापीचा सुस्पष्ट नकाशा ! (ASI Makes Gyanvapi Map)

वाराणसी (उत्तरप्रदेश) – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पथकाने ज्ञानवापीचा सुस्पष्ट मानचित्र (नकाशा) बनवले आहे. असे प्रथमच घडले आहे. यापूर्वी जेम्स प्रिन्सेप आणि इतरांनी बनवलेले नकाशे काशीच्या लोकांशी झालेल्या चर्चा किंवा संभाषण यांवर आधारित होते. ते कल्पनेनुसार बनवले गेले, ज्याला सुस्पष्ट म्हणता येणार नाही.

आता प्रथमच वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून ज्ञानवापी आणि त्याची रचना यांची लांबी आणि रुंदी मोजून प्रामाणिक तपशील उपलब्ध झाल्यानंतर सुस्पष्ट नकाशा बनवण्यात आला.  ज्ञानवापीचा ८३९ पानी सर्वेक्षण अहवाल जिल्हा न्यायाधिशांच्या न्यायालयात सादर करण्यात आला.

यात देण्यात आलेल्या नकाशामध्ये सेंट्रल हॉल, नॉर्दर्न हॉल, दक्षिण हॉल, पूर्व-पश्‍चिम आणि उत्तर-दक्षिण मार्ग आणि ज्ञानवापीच्या सध्याच्या रचनेला लागून असलेल्या खोल्यांच्या लांबी आणि रुंदी यांची वास्तविक स्थिती तपशीलवार आहे.

‘इतिहासात प्रथमच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ज्ञानवापीचा सुस्पष्ट नकाशा बनवला आहे, असे आपण निश्‍चितपणे सांगू शकतो.’ – सर्वेक्षणातील शास्त्रज्ञ