शुक्रवारच्या नमाजपठणाला ज्ञानवापी येथे मुसलमानांकडून शक्तीप्रदर्शन !(Muslim Congregation Gyanvapi)

  • हिंदूंना व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाल्यावरून निषेध !

  • तब्बल २ सहस्र २४७ मुसलमान एकत्र

वाराणसी (उत्तरप्रदेश) – शुक्रवार, २ फेब्रुवारीच्या नमाजासाठी ज्ञानवापी येथे प्रथमच २ सहस्र २४७ एवढे मुसलमान पोचले. ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद समिती’च्या आवाहनावर व्यासजींच्या तळघरात प्रार्थना चालू झाल्याच्या निषेधार्थ ते नमाजपठण करण्यासाठी ज्ञानवापी येथे आले होते. येथे जागा अपुरी पडल्याने पोलिसांना मुसलमानांना माघारी जायला अथवा जवळपासच्या मशिदींमध्ये जाण्याचे आवाहन केले. या वेळी जमावाने दालमंडीत घोषणाबाजी करत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला.

केव्हा-केव्हा झाले शक्तीप्रदर्शन ?

२५ ऑक्टोबर २०१८ : ज्ञानवापी येथील वक्फ बोर्डाची भिंत पाडल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ २ सहस्र १०० मुसलमान दुसर्‍या दिवशी शुक्रवारच्या नमाजासाठी ज्ञानवापी येथे पोचले होते.

६ मे २०२२ : ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या वेळी २ सहस्र मुसलमानांनी नमाजपठण केले होते.

धर्मांधांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे !

या वेळी मुफ्ती अब्दुल बतीन नोमानी यांनी उपासकांना श्रद्धावान बनण्यास सांगितले. त्यांनी ज्ञानवापी येथील शुक्रवारच्या नमाजापूर्वी दिलेल्या भाषणात मशीद आणि व्यासजींच्या तळघरातील वास्तवाची जाणीव करून दिली. ते म्हणाले की, शहरातील शांतता कोणत्याही परिस्थितीत भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नमाजपठण केल्यानंतर थेट घरी जा ! आपला देश लोकशाहीवर आधारित आहे. त्याला चार खांब आहेत. एक आधारस्तंभ असलेली प्रसारमाध्यमे त्याचे दायित्व योग्य प्रकारे पार पाडत नाहीत. (एकीकडे निषेध करण्यासाठी मुसलमानांना नमाजपठणाला बोलावणारी इंतेजामिया मस्जिद समिती आणि दुसरीकडे साळसूदपणाचा आव आणणारे मुफ्ती ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदु-मुसलमान ऐक्यासाठी हिंदूंना नेहमी उपदेशाचे डोस पाजणारे आता वाराणसीतील मुसलमानांना शहाणपणाचा एक शब्दही ऐकवत नाहीत, हे जाणा !