|
पनवेल – कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात चोर्यांचे प्रमाण वाढतच आहे. १ फेब्रुवारी या दिवशी कळंबोली पोलीस ठाण्यात लोखंड बाजारातील ७ लाख ३३ सहस्र रुपयांचे स्टेनलेस स्टील चोरीला गेल्याची तक्रार व्यापार्यांनी प्रविष्ट केली होती. बाजारातील वाढत्या चोर्या रोखण्यासाठी पोलिसांनी १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे बाजार समितीला सुचवले होते. सध्या हे कॅमेरे लावण्याचे काम चालू आहे; पण रात्रीच्या वेळी रस्त्यावरील पथदिव्यांची वीज घालवून टोळीकडून गोदामे फोडून चोरी केली जात आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोखंड आणि पोलाद खरेदीविक्रीची उलाढाल कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारात होते.